

तुर्भे, ता. २७ (बातमीदार) : ऐन उन्हाळ्यात नवी मुंबईतील अनेक भागांमध्ये १२ ते २४ तास वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक, व्यापारी, उद्योग क्षेत्र आणि रुग्णसेवा यंत्रणा गंभीर अडचणीत सापडली आहे. नियमितपणे वीजदेयक भरूनही नागरिकांना अखंडित वीजपुरवठा मिळत नसल्यामुळे संताप वाढत आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिकेचे उपमहापौर दशरथ भगत यांनी महावितरणच्या असंवेदनशील कारभाराविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी महावितरण वाशी मंडळाचे अधीक्षक अभियंता यांना पत्र पाठवून बुधवारी (ता. २९) वीज ग्राहक आणि लोकप्रतिनिधींच्या शिष्टमंडळासोबत बैठक आयोजित केली आहे.
प्रभाग क्र. १८ मधील वाशीगाव, गावियो परिसर, सानपाडा-पामबीच परिसर, वाशी सेक्टर ३० आणि सेक्टर १७ या भागांमध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याची गंभीर तक्रार करण्यात आली आहे. उष्णतेच्या तीव्रतेत जेष्ठ नागरिक, आजारी रुग्ण आणि लहान मुलांना याचा मोठा फटका बसत असून, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. नवी मुंबई पालिका क्षेत्रातील विविध नोड्समध्ये महावितरणमार्फत भूमिगत विद्युत कामांसाठी रस्ते, पदपथ आणि इतर सार्वजनिक मालमत्तेमध्ये विनापरवानगी खोदकाम केले जात आहे. यामुळे महापालिकेच्या कोट्यवधींच्या मालमत्तेची हानी होत असल्याचे उपमहापौरांनी निवेदनात नमूद केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.