भूमी अभिलेख विभागाच्यावतीने जनसंवाद दिन

भूमी अभिलेख विभागाच्यावतीने जनसंवाद दिन
Published on

भूमी अभिलेख विभागाच्या वतीने जनसंवाद दिन

विरार, ता. २८ (बातमीदार) : वसई तालुक्यातील अनेक नागरिकांची जमीन मोजणीची प्रकरणे तांत्रिक अडचणी किंवा प्रशासकीय विलंबामुळे प्रलंबित आहेत. या प्रकरणांचा त्वरित निपटारा करून सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी आमदार स्नेहा दुबे-पंडित यांच्या पुढाकाराने आणि भूमी अभिलेख विभाग, वसई यांच्या सहकार्याने विशेष ‘जनसंवाद’ दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या जनसंवाद दिनामध्ये भूमी अभिलेख विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार असून, नागरिकांच्या तक्रारींचे प्रत्यक्ष निवारण केले जाईल. हा जनसंवाद गुरुवारी (ता. ३०) सकाळी ११ ते २ या वेळेत वसई तहसीलदार कार्यालयाच्या तळमजल्यावर आयोजित करण्यात आला आहे. ज्या नागरिकांची जमीन मोजणीची प्रकरणे प्रलंबित आहेत, त्यांनी आमदारांच्या नावे त्यांच्या समस्येबाबत लेखी अर्ज (तीन प्रतींत) सोबत आणावा, तसेच या अर्जासोबत त्यांनी यापूर्वी भूमी अभिलेख विभागाकडे सादर केलेल्या मूळ अर्जाची झेरॉक्स जोडावी आणि या जनसंवाद दिनास सर्व तक्रारदारांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार दुबे-पंडित यांच्या कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com