

पक्षी निरीक्षणातून पर्यावरणाचे धडे
वसईच्या अण्णासाहेब वर्तक विद्यालयातील उपक्रम
विरार, ता. २८ (बातमीदार) ः वसईच्या विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेच्या अण्णासाहेब वर्तक विद्यालय परिसरात पक्षीनिरीक्षण सफारीत विद्यार्थी, निसर्गप्रेमींना समृद्ध जैवविविधतेचा अनोखा अनुभव मिळाला. विज्ञान क्लबच्या सहकार्याने ‘अतावी बर्ड फाउंडेशन’तर्फे हा उपक्रम करण्यात आला.
पक्षीतज्ज्ञ ख्रिस रॉड्रिग्स यांनी सफारीचे मार्गदर्शन केले. त्यांच्या सखोल ज्ञानपूर्ण, रंजक माहितीमुळे सहभागींचा अनुभव अधिक समृद्ध झाला. महाविद्यालयाच्या घनदाट वृक्षराजीने नटलेला परिसर विविध पक्ष्यांसाठी अनुकूल अधिवास असल्याचे प्रकर्षाने जाणवले. शहरी हरित क्षेत्रांचे पर्यावरणीय महत्त्व, जैवविविधतेच्या संवर्धनातील भूमिकेबाबत रॉड्रिग्स यांनी मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. अरविंद उबाळे, विज्ञान क्लब समन्वयक डॉ. सुनील आव्हाड, अतावी बर्ड फाउंडेशन यांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता वाढली.
----------------------------
दुर्मिळ घुबडाचे दर्शन
कॉमन टेलरबर्ड, ओरिएंटल मॅगपाई रॉबिन, कॉमन मैना, रोझ-रिंग्ड पॅराकीट, एशियन कोयल, रेड-वेंटेड बुलबुल यांसारख्या विविध पक्ष्यांचे निरीक्षण करण्यात आले. कॉमन टेलरबर्डच्या घरटे बांधण्याच्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीबाबत माहिती देण्यात आली. तर मॅगपाई रॉबिनच्या मधुर किलबिलाटाने वातावरण भारावून गेले. इंडियन स्कॉप्स घुबडाचे दुर्मिळ दर्शन संस्मरणीय ठरले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.