

आशागडच्या कारभाऱ्यांवर शिक्का
सरपंचपदासाठीची मतदान प्रक्रिया उत्साहात
कासा, ता. २८ (बातमीदार) ः डहाणू तालुक्यातील आशागड ग्रामपंचायतीमध्ये मतदान प्रक्रिया मंगळवारी पार पडली. या वेळी सरपंचपदासह सात जागांच्या उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले.
आशागड ग्रामपंचायतीत सरपंचपदासाठी दोन उमेदवार रिंगणात असून चार प्रभागांमध्ये मतदान सुरू आहे. तालुक्यातील निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने एकूण ६८ कर्मचारी नियुक्त केले आहेत. तसेच दहा मतदान यंत्रांचा वापर करण्यात येत असून दहा यंत्रे राखीव ठेवण्यात आली आहेत. दोन हजार ५६९ मतदारांसाठी चार केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. ग्रामस्थांमध्ये मतदानाबाबत उत्सुकता पाहायला मिळत आहे.
----------------------
राष्ट्रीय कर्तव्याचे भान
आशागड येथील मतदान केंद्रावर लग्नासाठी सुरत येथे रवाना होण्यापूर्वी नवरदेव दानिश खाटीक यांनी सकाळी मतदानाचा हक्क बजावला. या वेळी मतदान माझे राष्ट्रीय कर्तव्य असल्याचे दानिशने सांगितले. तर ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने मतदान केंद्रांकडे धाव घेतल्याने उत्साहाचे वातावरण होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.