

उल्हासनगर, ता. २८ (वार्ताहर) : महापालिकेने ‘सेवा हक्क दिना’निमित्त शहरभर व्यापक जनजागृती मोहीम राबवत नागरिकांच्या हक्कांविषयी जागरूकता वाढवण्याचा उपक्रम हाती घेतला. आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवलेल्या या मोहिमेत प्रशासनातील पारदर्शकता आणि उत्तरदायित्व यावर विशेष भर देण्यात आला.
२८ एप्रिलला महापालिकेतील सर्व विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ‘सेवेच्या बांधिलकीची’ शपथ घेत नागरिककेंद्री प्रशासनाचा दृढ संकल्प व्यक्त केला. नागरिकांना विविध शासकीय सेवांची माहिती आणि शुल्क सुलभपणे मिळावे यासाठी महापालिका कार्यालये आणि ‘आपले सरकार’ केंद्रांवर डिजिटल क्यूआर कोड्स लावण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच, ‘सिटिझन्स चार्टर’ महापालिकेच्या प्रवेशद्वारावर आणि अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करून विभागनिहाय सेवांची स्पष्ट माहिती उपलब्ध करून दिली. शिक्षण विभागाने शाळांमध्ये निबंध, वक्तृत्व स्पर्धा आणि परिसंवादांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सेवा हक्कांविषयी जागरूकता निर्माण केली.
याशिवाय, भारत स्काऊट, एनसीसी आणि एनएसएस विद्यार्थ्यांच्या रॅलींमधून शहरभर जनजागृतीचा संदेश पोहचवला. क्रीडा विभागाने युवक मेळावे आणि प्रमुख मैदानांवर माहिती फलकांद्वारे तरुणांशी संवाद साधला. समाज माध्यमांचा प्रभावी वापर करत या सर्व उपक्रमांना व्यापक प्रसिद्धी देत महापालिकेने सेवा हक्क अभियानाला आधुनिक आणि लोकाभिमुख दिशा दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.