

मुंब्रा, ता. २८ (बातमीदार) : येथील पोलिसांनी अमली पदार्थविरोधी मोहिमेत गांजा सेवन करणाऱ्या दोन तरुणांना अटक केली आहे. शमशेर मुस्तफा शेख (वय ३८) आणि शादाफ फारूक वस्ता (वय २७) अशी तरुणांची नावे आहेत. मुंब्रा बायपास रोडवरील एस. के. रेसिडेन्सीजवळील मोकळ्या मैदानात काही व्यक्ती गांजाचे सेवन करत असल्याची माहिती मुंब्रा पोलिस ठाण्याच्या पथकाला गस्तीदरम्यान मिळाली होती. त्यानुसार दोन वेगवेगळ्या ठिकाणी सापळा रचून त्यांना रंगेहाथ पकडले. कारवाईदरम्यान त्यांच्याकडील अमली पदार्थांचे साहित्य जप्त करून नष्ट करण्यात आले. त्यानंतर दोघांनाही छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे वैद्यकीय तपासणीसाठी नेले. तपासणीत त्यांनी गांजाचे सेवन केल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी दोघांविरुद्ध एन.डी.पी.एस. कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.