दिव्यांगांना निधी वाटप

दिव्यांगांना निधी वाटप
Published on

दिव्यांगांना निधी वाटप
पेण नगरपालिकेकडून २४७ लाभार्थींना प्रत्येकी सात हजारांची मदत
पेण, ता. २८ (वार्ताहर) : पेण नगरपालिकेच्या वतीने २४७ दिव्यांग लाभार्थींना प्रत्येकी सात हजार रुपयांच्या अपंग कल्याण निधीचे वाटप आमदार रवींद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. हा निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला.
यावेळी नगराध्यक्षा प्रितम पाटील यांनी सांगितले की, दिव्यांग बांधवांना सक्षम आणि स्वावलंबी करण्यासाठी नगरपालिकेचा प्रयत्न सुरू आहे. निधी वाटपाचा कार्यक्रम उशिरा झाला असला तरी शहरातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा आमचा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच येत्या ३ डिसेंबर रोजी जागतिक अपंग दिनानिमित्त लाभार्थींना प्रत्येकी दहा हजार रुपयांचा निधी देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास आमदार रविंद्र पाटील, उपनगराध्यक्ष निवृत्ती पाटील, सभापती आफ्रिन आखवारे, मुख्याधिकारी जीवन पाटील यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका आणि दिव्यांग लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Marathi News Esakal
www.esakal.com