जिल्ह्यातील रिसाॅर्ट, समुद्रकिनारे हाउसफुल्ल

जिल्ह्यातील रिसाॅर्ट, समुद्रकिनारे हाउसफुल्ल
Published on

जिल्ह्यातील रिसाॅर्ट, समुद्रकिनारे हाउसफुल्ल
पर्यटक घेताहेत स्विमिंग पूल, समुद्राचा आनंद
अलिबाग, ता. २८ (वार्ताहर) ः उन्हामुळे होणारी काहिली, त्यात शाळांना लागलेली उन्हाळी सुट्टी यामुळे सध्या स्थानिकांसह पर्यटकांची पावलेही रिसाॅर्ट, वाॅटर पार्कसह समुद्रकिनाऱ्यांकडे वळली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील रिसाॅर्ट, समुद्रकिनारे हाउसफुल्ल झाल्याचे पाहायला मिळत आहेत. त्यामुळे रिसाॅर्टचालक, वाॅटर पार्क, समुद्रकिनारी असणाऱ्या हाॅटेल्सचा व्यवसाय सध्या तेजीत सुरू आहे.
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात उष्णतेचा पारा ३५ ते ३८ अंशांपर्यंत वाढला आहे. त्यामुळे नागरिक उन्हामुळे हैराण झाले आहेत. त्यातच आता विद्यार्थ्यांच्याही परीक्षा झाल्याने उन्हाळी सुट्टया सुरू झाल्या आहेत. यामुळे रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण, मुरूड, कर्जत, माथेरान, श्रीवर्धन, खोपोली येथे असणारे मोठमोठे रिसार्ट, वाॅटर पार्क पर्यटकांनी भरल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे अलिबाग, नागाव, किहिम, मांडवा, मुरूड, काशिद, श्रीवर्धन, दिवेआगर, हरिहरेश्वरसारख्या समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांसह स्थानिक नागरिकही निळ्याशार समुद्रात पोहण्याचा व विविध वाॅटरस्पोर्टचा आनंद लुटत आहेत.

स्विमिंग पूल असणाऱ्या रिसाॅर्टला पसंती
सध्या उष्णतेची काहिली कमी करण्यासाठी ज्या रिसाॅर्ट अथवा काॅटेजेसमध्ये स्विमिंग पूल आहे, अशा रिसाॅर्ट व काॅटेजला पर्यटकांची पसंती आहे. यामुळे काॅटेज, रिसाॅर्ट व्यावसायिकांनीही पर्यटकांना आकर्षक ऑफर दिल्या आहेत. त्यामुळे पर्यटकही गर्दी करीत आहेत.

समुद्रकिनाऱ्यांवर वाॅटरस्पोर्टचा आनंद
वॉटरस्पोर्टही पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरत आहेत. जेट-स्की, बॅनाना राईड, पॅरासेलिंग अशा विविध रोमांचक खेळांचा अनुभव घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करीत आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने स्थानिक प्रशासन आणि वॉटरस्पोर्ट व्यावसायिकांकडून योग्य ती काळजी घेतली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com