माणगावच्या ललित कदमची जलतरणात कामगिरी

माणगावच्या ललित कदमची जलतरणात कामगिरी
Published on

माणगावच्या ललित कदमची जलतरणात कामगिरी
चार सुवर्ण व एक रौप्य पदकांची कमाई
माणगाव, ता. २८ (वार्ताहर)ः माणगाव येथील ललित सखाराम कदम याने राज्यस्तरीय महा स्विम चॅम्पियनशिप २०२६ मध्ये उल्लेखनीय यश संपादन करत तालुक्याचे नाव उज्ज्वल केले आहे. बालेवाडी येथील शिव छत्रपती क्रीडा प्रबोधिनीमध्ये २६ एप्रिल रोजी पार पडलेल्या या स्पर्धेत राज्यभरातील विविध वयोगटातील जलतरणपटूंनी सहभाग घेतला होता.
रोहा येथील जे. एम. राठी विद्यालयाचा विद्यार्थी असलेल्या ललितने फ्री स्टाईल, बॅक स्ट्रोक, ब्रेस्ट स्ट्रोक आणि बाय फिन प्रकारांमध्ये भाग घेत चार सुवर्ण व एक रौप्य पदक पटकावले. या यशामुळे त्याने आपल्या गटात चॅम्पियनशिपही जिंकली.
ललितच्या या यशामागे प्रशिक्षक भूषण शिर्के, भूषण म्हात्रे व निखिल शिंदे यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले आहे. विद्यालयाचे प्रशासनही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत असून, भविष्यात रायगड जिल्ह्याचे नाव अधिक उंचावेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com