

पावसाळ्यापूर्वी पेणमध्ये रस्त्यांचे काँक्रीटीकरण वेगात
अतिक्रमणांवर कारवाई; मुख्य बाजारपेठेतील रस्ते रुंदीकरणाची मागणी
पेण, ता. २८ (वार्ताहर) : रायगड जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर असलेल्या पेणमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिक त्रस्त होते. अनेक वर्षांपासून अरुंद, खड्डेमय आणि नादुरुस्त रस्त्यांमुळे वाहतुकीची समस्या गंभीर झाली होती. मात्र, आता नगरपालिकेकडून शहरातील रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण युद्धपातळीवर सुरू करण्यात आले असून, पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
रस्त्यांच्या कामात अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवरही पालिकेने कारवाई सुरू केली आहे. नगरपालिका ते अंतोरा रोडदरम्यान नरदास चाळ ते अन्नपूर्णा कॉर्नरपर्यंतची अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत. त्यामुळे रस्ते बांधकामाला गती मिळाली आहे. तसेच भुंडा पुल ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक हा रस्ता काँक्रीटीकरणामुळे सुस्थितीत आला असून, वाहतूक कोंडी कमी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासन प्रयत्नशील असून स्वच्छ व सुबक पेण घडवण्याचा संकल्प करण्यात आला आहे. नागरिकांनीही सुरू असलेल्या कामांबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
कोट :
शहरातील मुख्य बाजारपेठ आणि मिरची गल्ली येथील रस्तेही रुंदीकरणात यावेत, जेणेकरून वाहतुकीची समस्या सुटेल आणि नागरिकांना दिलासा मिळेल.
- हरीष बेकावडे, सामाजिक कार्यकर्ते
मागणीचा सूर
पेणमधील मुख्य बाजारपेठ व मिरची गल्लीतील रस्ते अरुंद असून, गटारांचीही दुरवस्था आहे. त्यामुळे या भागातील रस्त्यांचे रुंदीकरण आणि सुधारणा करण्याची मागणी जोर धरत आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, या भागातील कामे झाल्यास शहरातील वाहतूक व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.