वरसेत ‘पढाई से दोस्ती’ शिबिराचा उत्साहात समारोप

वरसेत ‘पढाई से दोस्ती’ शिबिराचा उत्साहात समारोप
Published on

वरसेत ‘पढाई से दोस्ती’ शिबिराचा उत्साहात समारोप
खेळता खेळता शिक्षणातून विद्यार्थ्यांच्या कौशल्यांना चालना
रोहा, ता. २८ (बातमीदार) : रोहा तालुक्यातील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी आवड निर्माण करण्यासाठी ‘पढाई से दोस्ती’ या उपक्रमांतर्गत वरसे येथे आयोजित दोन दिवसीय उन्हाळी शिबिराचा उत्साहात समारोप झाला. पुणे येथील ज्ञान प्रबोधिनी शैक्षणिक उपक्रम संशोधिका, ग्लोबल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड तसेच श्री विवेकानंद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, रोहा यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.
शनिवार व रविवारी पार पडलेल्या या शिबिरात तळाघर, किल्ला, धाटाव, वरसे, सानेगाव आदी गावांतील सुमारे १२० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. वाचन, लेखन, श्रवण आणि बोलण्याच्या कौशल्यांचा विकास हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
शिबिरात ‘खेळता खेळता शिकूया’ या संकल्पनेवर आधारित विविध उपक्रम राबविण्यात आले. गटखेळ, शब्दखेळ, चित्रवाचन, गोष्टी ऐकून चर्चा, तसेच वाक्यरचना यांसारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या भाषिक कौशल्यात लक्षणीय सुधारणा दिसून आली. विद्यार्थ्यांना स्वतः गोष्टी तयार करण्यास प्रोत्साहन देण्यात आले तसेच गटचर्चा व सादरीकरणातून त्यांच्या संवादकौशल्याला चालना मिळाली.
या शिबिरासाठी वरसे ग्रामपंचायत तसेच स्थानिक मान्यवरांचे सहकार्य लाभले. ज्ञान प्रबोधिनी संस्थेचे मार्गदर्शक, विवेकानंद संस्थेचे सदस्य, स्थानिक शिक्षक व पालकांनी सक्रिय सहभाग घेतला. शिक्षण मित्रांनी केलेल्या नियोजनामुळे शिबिर यशस्वी ठरले.

फोटो कॅप्शन : पढाई से दोस्ती या उन्हाळी शिबीरात सहभागी झालेले विद्यार्थी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com