रायगडमध्ये डिजिटल जनगणनेची जोरदार तयारी

रायगडमध्ये डिजिटल जनगणनेची जोरदार तयारी
Published on

रायगडमध्ये डिजिटल जनगणनेची जोरदार तयारी
मोबाईल ॲपद्वारे माहिती संकलन; नागरिकांना स्वयंनोंदणीचीही सुविधा
अलिबाग, ता. २८ (वार्ताहर) : आगामी जनगणना २०२७च्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा प्रशासनाने तयारीला वेग दिला असून, यंदा प्रथमच डिजिटल माध्यमातून माहिती संकलन करण्यात येणार आहे. मोबाईल ॲपच्या सहाय्याने प्रगणक नागरिकांची माहिती नोंदवतील, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा जनगणना अधिकारी किशन जावळे यांनी दिली.
देशाच्या इतिहासातील ही १६वी तर स्वातंत्र्यानंतरची ८वी जनगणना असणार आहे. जनगणना दोन टप्प्यांत पार पडणार असून, पहिल्या टप्प्यात १ मे ते १४ जून २०२६ दरम्यान घरयादी व घरगणना प्रक्रिया राबवली जाईल. या कालावधीत १ ते १५ मेदरम्यान नागरिकांना अधिकृत संकेतस्थळावरून स्वतःची माहिती ऑनलाइन भरता येणार आहे. त्यानंतर प्रगणक प्रत्यक्ष भेट देऊन मोबाईल ॲपद्वारे माहिती संकलित करतील. दुसरा टप्पा फेब्रुवारी २०२७मध्ये पार पडणार आहे.
या मोहिमेसाठी जिल्ह्यातील तहसीलदार, मुख्याधिकारी आणि पनवेल महापालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. जिल्ह्यासाठी ६९ क्षेत्रीय प्रशिक्षक नियुक्त करण्यात आले असून, ते पाच हजार ९८ प्रगणक आणि ८६३ पर्यवेक्षकांना मार्गदर्शन करणार आहेत.

माहिती गोपनीयतेची हमी
जनगणनेदरम्यान नागरिकांकडून वय, लिंग, शिक्षण, व्यवसाय यांसारखी महत्त्वाची माहिती संकलित केली जाणार असली, तरी ती पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येणार आहे. ही माहिती केवळ सांख्यिकीय विश्लेषण आणि विकास नियोजनासाठीच वापरली जाईल. त्यामुळे नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता अचूक माहिती देऊन या राष्ट्रीय उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com