

ठाणे शहर, ता. २८ (बातमीदार) : शहरात तापमानाचा पारा ४० अंशाजवळ पोहोचला आहे. उष्माघातसदृश त्रासाबाबत रुग्णसंख्या वाढू लागली आहे, तर दुसरीकडे पशुपक्ष्यांनादेखील वाढत्या तापमानाचा फटका बसू लागला आहे. सिमेंटच्या जंगलामुळे पाणवठे गायब झाल्याने वाढते तापमान मुक्या जीवांवर बेतू लागले आहे. ठाणे पूर्व भागात मंगळवारी (ता. २८) तीन कावळे मृतावस्थेत आढळून आले. प्रथम दर्शनी त्यांचा मृत्यू उष्माघाताने झाल्याचे पर्यावरण अभ्यासकांचे मत आहे.
आठवडाभरापासून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये उष्माघाताच्या लाटा सुरू झाल्या आहेत. ठाण्याची स्थितीदेखील समाधानकारक नाही. उष्माघाताचा त्रास होत असलेले रुग्ण रुग्णालयात वाढू लागले आहेत. तापमानाचा त्रास होत असलेले १० टक्के रुग्ण बाह्य रुग्ण विभागात येत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. माणसांना या प्रकारचा त्रास जाणवत असतानाच पशुपक्ष्यांनादेखील याचा फटका बसत आहे. मंगळवारी ठाणे पूर्व भागात जिजामाता मार्ग, बारा बंगला आदी ठिकाणी तीन कावळे मृत अवस्थेत आढळून आले. त्यांचे प्राथमिक निरीक्षण केले असता त्यांचा मृत्यू डी-हायड्रेशन, उष्माघातासारख्या त्रासाने झाला असावा, असा संशय पर्यावरण अभ्यासक, ज्येष्ठ पशुवैद्यक डॉ. युवराज कागिनकर यांनी व्यक्त केला. मात्र, कावळ्यांच्या शवविच्छेदनानंतरच खरे कारण कळेल, असेही ते म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.