मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेत १०० टक्के उद्दिष्टपूर्ती

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेत १०० टक्के उद्दिष्टपूर्ती
Published on

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेत १०० टक्के उद्दिष्टपूर्ती
प्रमुख बँक अधिकारी व शाखा व्यवस्थापकांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव
अलिबाग, ता. २८ (वार्ताहर) : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेंतर्गत २०२५-२६ या आर्थिक वर्षात १०० टक्के उद्दिष्टपूर्ती करणाऱ्या प्रमुख बँक अधिकारी व शाखा व्यवस्थापकांचा जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी स्टेट बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक विलास शिंदे, बँक ऑफ इंडियाच्या विभागीय व्यवस्थापक दीपा सहानी, बँक ऑफ इंडियाचे अग्रणी बँक व्यवस्थापक विजयकुमार कुलकर्णी, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक मंदार वर्तक तसेच विविध बँकांचे शाखा व्यवस्थापक उपस्थित होते.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी बँक अधिकाऱ्यांनी दिलेल्या उत्कृष्ट सहकार्याबद्दल जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सर्वांचे अभिनंदन केले. तसेच सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी प्राप्त उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी सर्व बँकांनी कृती आराखडा तयार करून नियोजित वेळेत उद्दिष्ट पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले. कार्यक्रमाच्या शेवटी जिल्हा उद्योग केंद्र, रायगडचे महाव्यवस्थापक जी. एस. हरळय्या यांनी उपस्थितांचे अभिनंदन करून आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com