मिरा भाईंदरमध्ये ३८ इमारती धोकादायक

मिरा भाईंदरमध्ये ३८ इमारती धोकादायक
Published on

धोकादायक ३८ इमारती रडारवर
मिरा-भाईंदर पालिकेकडून कारवाईचे संकेत
भाईंदर, ता. २८ (बातमीदार): मिरा-भाईंदर शहरात ३८ इमारती धोकादायक असल्याचे पालिका सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. या इमारतींवर पावसाळा सुरू होण्यापूर्वी कारवाई केली जाणार आहे.
३० वर्षे जुन्या अथवा मोडकळीस आलेल्या इमारतींचे प्रत्येक प्रभागाच्या सहाय्यक आयुक्तायांकडून दरवर्षी सर्वेक्षण केले जाते. त्यानंतर इमारतींना नोटिसा बजावून संरचनात्मक परीक्षण करून घेण्याच्या सूचना दिल्या जातात. त्यानुसार शहरातील सर्व सहा प्रभागांमधील मोडकळीस आलेल्या इमारतींना सहाय्यक आयुक्तांकडून नोटिसा बजावल्या आहेत. तसेच इमारतींच्या संरचनात्मक परीक्षणासाठी पालिकेने बांधकाम अभियंत्यांचे पॅनेल नियुक्त केले आहे. या अभियंत्यांकडून ४५३ इमारतींचे परीक्षण करण्यात आले. त्यानंतर इमारतींची सी-१, सी-२ अे, सी-२ बी, सी-३ अशा चार प्रकारांमध्ये वर्गवारी केली आहे. यामध्ये ३८ इमारतींचा समावेश आहे.
----------------------------
विभाग प्रकार संख्या
सी-१ - अतिधोकादायक इमारती ३८
सी-२ - इमारतींची दुरुस्ती शक्य ३६
सी-२ बी - इमारत रिकामी न करता दुरुस्ती ३४४
सी-३ - इमारतींची किरकोळ दुरुस्ती ३६
------------------------
प्रशासनासमोर आव्हान
सी-१ प्रकारातील धोकादायक इमारती तोडल्या नाहीत, तर पावसाळ्यात दुर्घटना होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर इमारती तोडण्याची कारवाई लवकरच सुरू केली जाणार आहे. परंतु, अनेक इमारतीमधील रहिवासी इमारत रिकामी करण्यास तयार होत नसल्याने प्रशासनासमोर आव्हान आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com