

वाशी, ता. २८ (बातमीदार) : तुर्भे क्षेपणभूमीजवळ मृत जनावरांसाठी अत्याधुनिक स्मशानभूमी उभारण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. हा प्रस्ताव पटलावर आल्यानंतर नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी स्थगितीची मागणी केली होती. तुर्भे क्षेपणभूमीजवळ कोणत्या ठिकाणी स्मशानभूमी उभारणार आहे, असा प्रश्न उपस्थित केला. या वेळी शहर अभियंता शिरीष आरदवाड यांनी श्वान केंद्राच्या बाजूला बांधणार असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर स्थायी समितीने सूचनांसह हा प्रस्ताव मंजूर केला. या वेळी नगरसेवक आकाश मढवी यांनीसुद्धा दिघा-ऐरोली विभागामध्ये मृत जनावरांसाठी स्मशानभूमी उभारण्याची मागणी केली.
नवी मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती अशोक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक पार पडली. नवी मुंबई शहरात मृत जनावरांची विल्हेवाट लावण्यासाठी योग्य सुविधा उपलब्ध नसल्याने अनेकदा उघड्यावर टाकण्याच्या घटना घडत होत्या. यामुळे दुर्गंधी, कीटकांचा प्रादुर्भाव तसेच विविध आजारांचा धोका निर्माण होत होता. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही गंभीर बाब लक्षात घेऊन महापालिकेने अत्याधुनिक आणि वैज्ञानिक पद्धतीने स्मशानभूमी उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत मृत जनावरांची सुरक्षित विल्हेवाट, प्रदूषण नियंत्रण आणि स्वच्छता व्यवस्थापन यावर विशेष भर दिला जाणार आहे. आधुनिक यंत्रसामग्री आणि तंत्रज्ञानाचा वापर करून पर्यावरणपूरक पद्धतीने प्रक्रिया केली जाणार असल्याने परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पावणेदोन लाखांचा खर्च
पालिका एक कोटी ७८ लाख खर्च करून क्षेपणभूमी उभारणार आहे. या निर्णयामुळे नवी मुंबईत स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत सकारात्मक बदल होणार असून, शहर अधिक स्वच्छ, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक बनण्यास मदत होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.