

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २८ ः फेरीवाल्यांच्या विळख्यामध्ये सापडलेल्या उपवन तलाव परिसराने अखेर मोकळा श्वास घेतला आहे. महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या सूचनेनंतर प्रशासनाने कारवाई करीत हा परिसर फेरीवालामुक्त केला आहे. याची खात्री करून घेण्यासाठी सोमवारी (ता. २७) रात्री अचानक महापौरांनी या परिसराला भेट देत पाहणी केली. या वेळी एकही फेरीवाला न दिसल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच नियमित ही कारवाई सुरू ठेवण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागाला दिले.
उपवन तलावाचा कायापालट झाल्यानंतर येथे ठाणेकरांची सकाळ, संध्याकाळ गर्दी वाढली आहे. पर्यटकही येथे येत आहेत. असे असले तरी फेरीवाल्यांचे प्रस्त वाढले होते. वाढत्या अनधिकृत व्यवसायांबाबत स्थानिक नगरसेविका परिषा सरनाईक आणि स्थानिक रहिवाशांनी महापौर पिंपळोलकर यांची भेट घेऊन तिथे होत असलेल्या फेरीवाल्यांबद्दलच्या तक्रारी केल्या होत्या. याबाबत महापौरांनी तत्काळ बैठक लावून संबंधित सहाय्यक आयुक्तांना कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. या आदेशांची अंमलबजावणी होत असल्याची खात्री करण्यासाठी महापौरांनी स्वतः सोमवारी रात्री ९ वाजता उपवन परिसराची पाहणी केली.
नागरिकांच्या हिताला प्राधान्य
महापौरांच्या निर्देशानुसार प्रशासनाने परिसरातील अनधिकृत टपऱ्या व फेरीवाल्यांवर कारवाई करीत उपवन परिसर फेरीवालामुक्त केला आहे. ही मोहीम यापुढेही सातत्याने सुरू ठेवावी, अशा सूचना महापौरांनी अधिकाऱ्यांना दिल्या. पाहणीदरम्यान महापौरांनी परिसरातील स्वच्छता, सुरक्षितता यांचा आढावा घेत नागरिकांच्या हिताला प्राधान्य देण्याचे निर्देश दिले. विशेषतः महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.
कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश
उपवन परिसरात पदपथालगत सार्वजनिक विभागामार्फत कामे सुरू असून ती कामे तातडीने पूर्ण करावीत, तसेच झाडांच्या वाढलेल्या फांद्यांची पावसाळ्यापूर्वी छाटणी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. या वेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे आणि पालिका अधिकारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.