कापूरबावडी परिसरात वाहतूक बदल

कापूरबावडी परिसरात वाहतूक बदल
Published on

ठाणे, ता. २८ (बातमीदार) : कापूरबावडी वाहतूक उपविभागाच्या हद्दीत श्री साईबाबा ट्रस्टतर्फे साईबाबा मंदिराचा २६वा वर्धापन दिन २८ एप्रिल ते २ मे या कालावधीत उत्साहात साजरा होत आहे. या निमित्ताने विविध धार्मिक विधी, सांस्कृतिक कार्यक्रम आणि भंडारा होणार असून, दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित आहे. गर्दीमुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी विशेष नियोजन केले आहे. वाहतूक पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी तात्पुरती वाहतूक अधिसूचना जारी करत बदल सूचवले आहेत.
अधिसूचनेनुसार साकेतहून बाळकुममार्गे करोळीकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना महालक्ष्मी मंदिराजवळ प्रवेश बंद राहणार आहे. या वाहनांसाठी महालक्ष्मी मंदिराजवळून डावीकडे वळून रुस्तमजी समोरील कटमार्गे नाशिक-मुंबई महामार्ग हा पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे. तसेच, कोळीवाडा बाजूकडून बाळकुममार्गे साकेतकडे जाणाऱ्या वाहनांना बाळकुम नाका येथे प्रवेश बंद राहील. या वाहनांनी सरळ पुढे जाऊन कापूरबावडी सर्कलमार्गे इच्छितस्थळी जावे, असा सल्ला देण्यात आला आहे. लोढा कट येथून बाळकुममार्गे करोळीकडे जाणाऱ्या वाहनांसाठीही प्रवेश बंद करण्यात आला असून, या वाहनांना लोढा कटवरून वळण घेऊन साकेतमार्गे पुढे जाण्याचे निर्देश दिले आहेत. ही वाहतूक अधिसूचना २८ एप्रिल ते २ मे दरम्यान दररोज सायंकाळी ४ ते रात्री १२ वाजेपर्यंत लागू राहणार आहे. पोलिस, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरिडॉर, ऑक्सिजन वाहने आणि इतर अत्यावश्यक सेवांना या निर्बंधातून सूट देण्यात आली आहे. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com