

वादग्रस्त वक्तव्यांचे कर्जतमध्ये तीव्र पडसाद
आमदार संजय गायकवाड व बागेश्वर बाबांचा निषेध
कर्जत, ता. २८ (बातमीदार) ः छत्रपती शिवाजी महाराजांबाबत करण्यात आलेल्या वादग्रस्त वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर कर्जत शहरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी सोमवारी (ता. २७) सायंकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात विविध पुरोगामी संघटना, राजकीय पक्ष आणि शिवप्रेमी नागरिकांनी एकत्र येत जोरदार निदर्शने केली.
शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाचे लेखक गोविंद पानसरे आणि संबंधित प्रकाशकांशी केलेल्या कथित फोन संभाषणातील वक्तव्यांमुळे वाद निर्माण झाला आहे. या ऑडिओ क्लिप समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात असून, कर्जतमध्येही याचे पडसाद उमटले. या वेळी बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनीही शिवरायांबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. आंदोलनात सहभागी झालेल्या वक्त्यांनी इतिहासाबाबत चुकीची माहिती पसरवू नये, तसेच महापुरुषांचा अवमान सहन केला जाणार नाही, असा इशारा दिला. इतिहास संशोधक वसंत कोळंबे यांनी मनोगत व्यक्त करताना दोन्ही वक्तव्यांचा निषेध नोंदवला. त्यांनी सांगितले की, शिवाजी महाराजांचा इतिहास हा अभ्यासपूर्ण असून, त्यावर कुठल्याही प्रकारची चुकीची भाष्ये करणे अयोग्य आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.