पवई चांदिवलीतील उद्यानांमध्ये गैरप्रवृत्तीवर आळा

पवई चांदिवलीतील उद्यानांमध्ये गैरप्रवृत्तीवर आळा
Published on

पवई चांदिवलीतील उद्यानांमध्ये गैरप्रवृत्तीवर आळा
सह्याद्री अतिथीगृहात उच्चस्तरीय बैठक

घाटकोपर, ता. २८ (बातमीदार) : पवई चांदिवली परिसरातील उद्यानांमध्ये वाढत्या गैरप्रवृत्ती, अमली पदार्थांचे सेवन आणि समाजविघातक प्रकारांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. यासंदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे मंत्री शंभुराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली विशेष उच्चस्तरीय बैठक पार पडली.

बैठकीत संवेदनशील उद्यान परिसरात सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्याचे, पोलिस यंत्रणेमार्फत विशेष मोहीम राबविण्याचे तसेच उद्यानांची सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले. नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ आणि सन्मानपूर्वक सार्वजनिक ठिकाणांचा वापर करता यावा, यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे या वेळी अधोरेखित करण्यात आले.

समाजविघातक प्रवृत्तींवर कठोर कारवाई करून नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत चांदिवली परिसर अधिक सुरक्षित करण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला. या महत्त्वपूर्ण बैठकीस आमदार दिलीप लांडे, महापालिकेच्या उद्यान विभागाचे उपायुक्त अजितकुमार आंबी, झोन १० चे पोलिस उपायुक्त दत्ता नलावडे तसेच स्थानिक प्रतिनिधी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com