

जिल्ह्यात १ मेपासून जनगणना
पालघर, ता. २८ ः जिल्ह्याची जनगणना १ मेपासून सुरू होणार आहे. ही जनगणना पूर्णतः डिजिटल स्वरूपाची असेल. दोन टप्प्यांत गणना केली जाणार असून पहिल्या टप्प्यात घरनिहाय तर दुसऱ्या टप्प्यात व्यक्तीनिहाय गणना केली जाणार आहे. जिल्ह्यातील आठ तालुके, एक महापालिका, तीन नगर परिषद आणि चार नगर पंचायतींमध्ये १५ जूनपर्यंत ही गणना केली जाणार आहे.
पहिल्या टप्प्यातील गणनेत नागरिकांनी मोबाईलमध्ये किंवा इतर मार्गाने डिजिटल प्रणालीद्वारे स्वतः माहिती देऊन स्वगणना करायची आहे. त्यासाठी https://se.census.gov.in या संकेतस्थळावर परिपूर्ण माहिती सादर करायची आहे. पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये १५ कार्यालयांतर्गत २४३०१८५ एवढ्या लोकसंख्येची गणना करणे अपेक्षित आहे. यासाठी ३.७१८ प्रगणक, ६३६ पर्यवेक्षक नेमण्यात आले आहेत. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात केल्या जाणाऱ्या घरगणनेमध्ये एकूण ३.४०१ इतक्या घर यादींचे गट आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.