टेमघरमधील १०० घरे जमीनदोस्त

टेमघरमधील १०० घरे जमीनदोस्त
Published on

भिवंडी, ता. २८ (वार्ताहर) : भिवंडीतील टेमघर परिसरात महापालिकेच्या आरक्षित भूखंडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी मंगळवारी मोठी कारवाई करण्यात आली. प्रभाग समिती क्रमांक २ चे सहाय्यक आयुक्त विनोद मनोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण पथकाने जेसीबीच्या साह्याने अनधिकृत चाळी जमीनदोस्त केल्या. या कारवाईमुळे अनेक कुटुंबांचे संसार उघड्यावर आले आहेत.
टेमघर येथील सर्व्हे क्रमांक १९ मधील गुरुचरण जागा महापालिकेच्या विकास आराखड्यानुसार शाळा व शाळेच्या मैदानासाठी आरक्षित करण्यात आली आहे. या जागेवर अनेक वर्षांपासून स्थानिकांनी अतिक्रमण करून चाळी उभारल्या होत्या. नगररचना विभागाकडून जागेची मोजणी झाल्यानंतर संबंधितांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यानंतर मंगळवारी ही कारवाई करण्यात आली. कारवाईत १०० घरांवर कारवाई केल्याची माहिती सहाय्यक आयुक्त विनोद मनोरे यांनी दिली. कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या कारवाईमुळे अनेक कुटुंबांवर बेघर होण्याची वेळ आली असून परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.

नागरिकांचा तीव्र विरोध
स्थानिक नागरिकांनी या कारवाईचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. पालिकेने जाणीवपूर्वक आम्हाला उद्ध्वस्त करण्यासाठी ही कारवाई केली, असा रोष रहिवासी विल्सन ठाकूर यांनी व्यक्त केला. ही जागा आमच्या कुटुंबाच्या मालकीची असून, जमीन मोजणी करताना किंवा कारवाईपूर्वी योग्य माहिती देण्यात आली नसल्याची तक्रार त्यांनी केली. आम्ही गेली दहा वर्षे येथे राहत होतो. मग इतक्या वर्षांनंतर अचानक ही जागा गुरुचरण असल्याचे कसे लक्षात आले? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. स्थानिक रहिवासी कुंता पाटील यांनीही स्थानिक लोकप्रतिनिधींवर आरोप करत, गुरुचरण जागेच्या नावाखाली आमची जागा ताब्यात घेण्यासाठी जबरदस्तीने कारवाई करण्यात आली, असा दावा केला.

भिवंडी : टेमघर परिसरात महापालिकेच्या आरक्षित भूखंडावरील अनधिकृत चाळी जमीनदोस्त करण्यात आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com