एसआयआयएलसी

एसआयआयएलसी
Published on

एसआयआयएलसी

डिहायड्रेशन व्यवसाय प्रशिक्षण
पुणे, ता. २८ : निर्जलीकरण व्यवसाय संधींविषयी मार्गदर्शन करणारे प्रशिक्षण थेट निर्जलीकरण उद्योग प्रकल्पात शनिवारी (ता. २ मे) आयोजिले आहे. यात निर्जलीकरण म्हणजे काय, या तंत्रज्ञानाचे महत्त्व, उपयोग, व्यवसाय म्हणून तो कसा करावा, निर्जलीकरणासाठीचे प्रमुख घटक, वेगवेगळ्या पद्धती, निर्जलीकरणाद्वारे तयार होणारे घटक पदार्थ व त्याचे उपयोग, उत्पादन व बाजारातील किंमत, मशिनरी, फ्लो चार्ट, बाजारपेठ, विपणन पद्धती, शासकीय योजना व अनुदान, जागेची निवड, गुंतवणूक, प्रकल्प अहवाल इ. विषयांवर मार्गदर्शन होणार आहे. फळभाज्या, पालेभाज्या, कंद, पानवर्गीय वनस्पती, आयुर्वेदिक वनस्पती, फळे, दुग्धजन्य पदार्थ, मांस, मच्छी, चिकन या पदार्थांचे प्रात्यक्षिक होणार आहे.

खासगी सुरक्षा एजन्सी
खासगी सुरक्षा (प्रायव्हेट सिक्युरिटी) एजन्सी व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या उद्योजकांसाठी शनिवार (ता. २ मे) व रविवारी (ता. ३ मे) प्रशिक्षण आयोजिले आहे. सुरक्षासेवांची वाढती गरज लक्षात घेता या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर व्यवसायाच्या संधी उपलब्ध होत आहेत. प्रशिक्षणात खासगी सुरक्षा एजन्सी कायद्याची माहिती, परवान्याची प्रक्रिया तसेच कागदपत्रांची माहिती दिली जाणार आहे. यासोबतच मनुष्यबळ व्यवस्थापन, सुरक्षा रक्षकांची निवड व प्रशिक्षण, तसेच कार्यक्षम टीम उभारण्याच्या पद्धती, व्यवसायाचे कॉस्टिंग, सेवा दर ठरवणे, क्लायंट मिळवण्याच्या प्रभावी युक्त्या, मार्केटिंग तंत्र आणि व्यवसाय विस्तारासाठी धोरणांवर मार्गदर्शन केले जाणार आहे.

रिअल इस्टेट प्रॉपर्टी व्हॅल्युएशन प्रशिक्षण
रिअल इस्टेट प्रॉपर्टी व्हॅल्युएशन करण्याच्या क्षेत्रात यायचा विचार करत असणाऱ्यांसाठी किंवा या क्षेत्रात काम करीत आहे; परंतु सुयोग्य पद्धत माहित नाही, अशांसाठी उपयुक्त असे प्रशिक्षण तुमच्यासाठी तुमचे कौशल्य विकसित करायला मदत करणार आहे. हे प्रशिक्षण ४ मेपासून आयोजिले आहे. हे प्रशिक्षण पूर्ण करून रिअल इस्टेट प्रॉपर्टी व्हॅल्युएशन करणाऱ्या कंपनीमध्ये नोकरी मिळू शकते. प्रशिक्षण ऑनलाइन स्वरूपात होणार आहे. सिव्हिल इंजिनिअर्स, आर्किटेक्ट व विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण उपयुक्त आहे.
संपर्क : ८४८४८११५४४, ८९५६३४४४७२, ८९५६३४४४७१, ९३५६९७३४२७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com