

एक इंचही जमीन देणार नाही
स्वाभिमानीच्या एल्गार मेळाव्यात निर्धार
सरळगाव, ता. २८ (बातमीदार) ः मुरबाड तालुक्यातील काळू नदीवर होत असलेल्या प्रकल्पास भूमिपुत्रांचा व शेतकऱ्यांचा विरोध होत आहे. या प्रकल्पामुळे १९ गावांतील लोकांना कोणताच लाभ होणार नसल्याने भूसंपादनास एक इंचही जमीन न देण्याचा निर्धार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील तळेगाव येथे झालेल्या एल्गार मेळाव्यात करण्यात आला.
सध्या सहा प्रकल्प मुरबाड, शहापूर तालुक्यात आहेत. याच प्रकल्पातून शहरांना पाणीपुरवठा होत आहे. मात्र, प्रकल्प ज्या तालुक्यात झाले आहेत, त्या तालुक्यातील प्रत्येक गावात पिण्याच्या पाण्यासाठी दररोज हंडा मोर्चा काढण्याची वेळ स्थानिकांवर आली आहे. मुरबाड तालुक्यातील अनेक गावे आजही उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करत आहेत. स्वतःच्या तालुक्यातील नदीवर धरण बांधूनही जर स्थानिकांना पाणी मिळणार नसेल, तर हा प्रकल्प कोणासाठी, असा सवाल शेट्टी यांनी उपस्थित केला आहे.
विराट मोर्चाचा इशारा
स्थानिकांचा विकासाला विरोध नसून सरकारने याच काळू नदीवर छोटे-छोटे प्रकल्प उभारल्यास मुबलक पाणीसाठा उपलब्ध होईल. शेतकऱ्यांच्या जमिनीही संपादित कराव्या लागणार नाहीत. तालुक्यात डोंगरी व सरकारी जागा अनेक गावांमध्ये उपलब्ध असून, त्या ठिकाणी प्रकल्प करण्यास कोणतीच अडचण नाही. जोपर्यंत सरकार हा प्रकल्प कायमचा रद्द करत नाही, तोपर्यंत लढा सुरूच राहील. गरज पडल्यास पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरावर विराट मोर्चा काढण्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला.
़़़़़़
या वेळी कुणबी सेना अध्यक्ष विश्वनाथ पाटील, इंदवी तळपुळे, प्रशांत सरखोत, पोपटराव देशमुख, विलासकाका देशमुख, हरिभाऊ राऊत, संभाजी देशमुख, किसन आलम, प्रवीण देशमुख, चंद्रकांत देशमुख, रमेश खाकर, काळू नदी परिसर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संभाजी फनाडे, सय्यद शेख, विलास पठारे, रोशन चौधरी, गणेश देशमुख, कैलास निमसे, संताजी देशमुख, विनोद निमसे, भावेश पठारे यांच्यासह बाधित गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.