एकाच दिवसात सीबीडी आणि ऐरोलीत दोघांचे लाखो रुपयांचे दागिने लुटले

एकाच दिवसात सीबीडी आणि ऐरोलीत दोघांचे लाखो रुपयांचे दागिने लुटले
Published on

ऐरोलीत लाखो रुपयांचे दागिने लुटले
नवी मुंबई, ता. २८ (वार्ताहर) : चेन स्नॅचिंग करणाऱ्यांनी सोमवारी ऐरोली आणि सीबीडी बेलापूर भागातील दोन जणांच्या अंगावरील सुमारे पावणेपाच लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर रबाळे आणि सीबीडी पोलिसांनी अज्ञात लुटारूंविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.
सीबीडी बेलापूर येथील पारसिक हिल परिसरात सोमवारी (ता. २७) सकाळी ६.३०च्या सुमारास पहिली घटना घडली. तक्रारदार महिला आपल्या मैत्रिणीसोबत मॉर्निंग वॉकसाठी पारसिक हिलवर जात असताना दुचाकीवरून आलेल्यांनी महिलेच्या गळ्यातील एक लाख ७५ हजार रुपये किमतीचे सात ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पलायन केले. या झटापटीत महिलेच्या गळ्याला दुखापतही झाली. याप्रकरणी सीबीडी बेलापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी घटना रात्री ९.५५च्या सुमारास ऐरोली सेक्टर ५मध्ये घडली. तक्रारदार सुरेश मुळीक हे सेक्टर ५ येथील हॉटेल प्राईम सूटसमोरील रस्त्यावर उभे होते. या वेळी दुचाकीवरून आलेल्यांनी मुळीक यांच्या गळ्यातील २५ ग्रॅम वजनाची तीन लाख सात हजार रुपये किमतीची सोन्याची चेन आणि पेंडल जबरदस्तीने हिसकावून पलायन केले. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com