

अपघातप्रकरणी आरोपीच्या
वडिलांचा जामीन रद्द करा!
पीडितेची उच्च न्यायालयात याचिका
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : मुंबईत फेब्रुवारी महिन्यात झालेल्या अपघाती मृत्यूप्रकरणी मुख्य अल्पवयीन आरोपीच्या वडिलांना दिलेल्या जामिनाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. त्या याचिकेची दखल घेऊन न्यायालयाने राज्य सरकारसह अन्य प्रतिवाद्यांना नोटीस बजावली आहे.
विद्याविहार येथील सोमय्या महाविद्यालयाजवळ ५ फेब्रुवारी रोजी झालेल्या अपघातात एक अल्पवयीन मुलगा चालवत असलेल्या वाहनाने एका दुचाकीला धडक दिली. त्यात धुर्मिल आणि मीनल पटेल हे जोडपे जखमी झाले. १० दिवसांनी धुर्मिलचा उपचारादम्यान मृत्यू झाल्यानंतर वाहनचालक पिता-पुत्रावर बेदरकार वाहन चालवणे, खून आणि इतरांच्या जीवाला व सुरक्षिततेला धोका निर्माण करणे, आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. याव्यतिरिक्त अल्पवयीन मुलाविरुद्ध बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) कायद्याच्या तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी अल्पवयीन मुलाला बाल न्याय मंडळाने, (जेजेबी) तर सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलाच्या व्यावसायिक वडिलांनाही जामीन मंजूर केला.
-----
प्रतिवाद्यांना नोटीस
वडिलांच्या जामिनाला मीनल पटेल यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले असून, जामीन रद्द करण्याची मागणी केली आहे. या अपघातात मीनल यांना गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर अद्याप उपचार सुरू आहेत, असा युक्तिवाद त्यांचे वकील अथर्व दांडेकर आणि रुबेन मस्कारेन्हास यांनी न्यायालयासमोर केला. आरोपी मुलाच्या मनात मानवी जीवनाबद्दल उघडपणे बेपर्वाई दिसत असल्याचेही त्यांनी न्यायालयाला सांगण्याचा प्रयत्न केला. त्याची दखल घेऊन न्या. आर. एम. जोशी यांच्या एकलपीठाने प्रतिवाद्यांना नोटीस बजावत पुढील सुनावणी ४ जून रोजी ठेवली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.