सी. एन. पाटील फाउंडेशनची नवी कार्यकारणी जाहीर

सी. एन. पाटील फाउंडेशनची नवी कार्यकारणी जाहीर
Published on

कल्याण (वार्ताहर) : सी. एन. पाटील फाउंडेशन या सामाजिक संस्थेची नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. संस्थेच्या कार्यालयात झालेल्या सभेत अध्यक्षपदी चंद्रशेखर पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी सुब्रमण्यम अय्यर, सचिवपदी बापू शिंपी, सहसचिवपदी भगवान धुमाळ आणि खजिनदारपदी किशोर चौधरी यांची निवड झाली. २०१९ पासून कार्यरत असलेल्या संस्थेने शहीद जवानांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत, रक्तदान शिबिरे, गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकिन मशीन उपलब्ध करून देणे, तसेच कोरोना काळात अन्नधान्य व आरोग्य सहाय्य असे विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com