जिल्हा आढावा बैठकीत उल्हासनगरच्या प्रश्नांवर चर्चा

जिल्हा आढावा बैठकीत उल्हासनगरच्या प्रश्नांवर चर्चा
Published on

उल्हासनगर, ता. २८ (बातमीदार) : एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ठाणे जिल्हा आढावा बैठकीत कुमार आयलानी यांनी उल्हासनगर शहरातील विविध प्रलंबित प्रश्न मांडले. यावर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी संबंधित विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
बैठकीत खरीप हंगामाचा आढावा, जिल्हा दक्षता समिती तसेच ‘सर्वांसाठी घरे’ योजनेअंतर्गत नियमबद्धता समितीच्या कामकाजाची सविस्तर चर्चा झाली. आमदार आयलानी यांनी शहरातील जीर्ण व धोकादायक इमारतींचा प्रश्न गंभीर असल्याचे सांगत तातडीने धोरणात्मक निर्णय घेण्याची मागणी केली. तसेच, पंतप्रधान आवास योजनेचा लाभ अधिकाधिक नागरिकांना मिळावा, अनधिकृत बांधकामे नियमित करण्याची प्रक्रिया सुलभ करावी, महापालिकेच्या स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेला मंजुरी द्यावी आणि विस्तारित मुंबई पायाभूत सुविधा योजनेतून शहरातील रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशा मागण्या त्यांनी मांडल्या. याशिवाय, महापालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी २०० कोटी रुपयांचा सरकारी निर्णय जारी करणे आणि पूर्णवेळ सहाय्यक संचालक नगररचना अधिकारी नियुक्त करण्याची मागणीही करण्यात आली. बैठकीस जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाल, आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com