

पाणजू ग्रामपंचायतीसाठी ८२.८५ टक्के मतदान
विरार (बातमीदार)ः वसई तालुक्यातील पाणजू ग्रामपंचायतीसाठी २६१ मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवला. या वेळी ८२.८५ टक्के मतदानाची नोंद झाली. वसई तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींमधील रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती. यात खार्डी-डोलीव, चंद्रपाडा, शिरवली, पाणजू, माजिवली-देपिवली, रानगाव ग्रामपंचायतींमधील सात जागांसाठी मंगळवारी मतदान झाले. सकाळी ७.३० वाजल्यापासून मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या, तर संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत ३१५ पैकी २६१ मतदारांनी मतदान केले. यात १३७ पुरुष आणि १२४ महिला मतदारांचा समावेश होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.