उष्म घाताने भोवळ आलेल्या तरुणांस खारघर वाहतूक

उष्म घाताने भोवळ आलेल्या तरुणांस खारघर वाहतूक
Published on

उष्माघाताने तरुणाला भोवळ
वाहतूक पोलिसांच्या मदतीमुळे सुखरूप

खारघर, ता. २८ (बातमीदार) : सायन-पनवेल महामार्गावर उष्माघातामुळे एका २२ वर्षीय तरुणाला चक्कर येऊन तो रस्त्यावर कोसळला. ही घटना मंगळवारी (ता. २८) दुपारी कोपरा ब्रिजजवळ घडली. वाहतूक पोलिसांच्या तत्परमुळे त्याला वेळेत उपचार मिळाल्याने तो सुखरूप आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुण दुचाकीवरून प्रवास करत असताना अचानक त्याला उष्माघाताचा त्रास झाला. चक्कर येत असल्याची जाणीव होताच त्याने वाहन रस्त्याच्या कडेला उभे केले. काही क्षणांतच तो रस्त्यावर कोसळला. ही बाब तेथून जाणाऱ्या वाहनचालकांच्या निदर्शनास आली आणि त्यांनी तत्काळ कोपरा ब्रिज व हिरानंदानी पुलालगत कर्तव्यावर असलेल्या खारघर वाहतूक पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिस हवालदार सुधीर राठोड, पोलिस नाईक रामेश्वर खताळ, पोलिस कॉन्स्टेबल सागर ठाकूर तसेच महिला पोलिस कॉन्स्टेबल अश्विनी राठोड यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक जी. एम. मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी तत्परतेने मदतकार्य करीत संबंधित तरुणाला उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात दाखल केले. वेळेवर उपचार मिळाल्यामुळे तरुणाची प्रकृती सुधारली असून त्याला घरी सोडण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com