कलिंगडासह बिर्याणीच्या नमुन्यांची तपासणी

कलिंगडासह बिर्याणीच्या नमुन्यांची तपासणी
Published on

कलिंगडासह बिर्याणीच्या नमुन्यांची तपासणी
पोलिसांकडून निवासस्थानाची कसून तपासणी
सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २८ : दक्षिण मुंबईतील पायधुनीत एकाच कुटुंबातील चार सदस्यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली असून, संबंधित घरातील खाद्यपदार्थांसह पाण्याचे नमुने न्यायवैद्यक तपासणीसाठी पाठवले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत कुटुंबाच्या फ्रीजमधील कलिंगड, चिकन बिर्याणी आणि पाण्याचे नमुने जप्त करून विश्लेषणासाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवले आहेत. पोलिसांनी घर आणि विशेषतः खोली सील केली असून, निवासस्थानाची कसून तपासणीही केली. घटनास्थळी सापडलेले सर्व पुरावे गोळा करण्यात आले आहेत. दरम्यान, पोलिसांनी संबंधित कलिंगड विक्रेत्याचाही शोध घेतला असून, त्याचा जबाब नोंदवला आहे. एकाच घरातील चार सदस्यांचे संशयास्पद मृत्यू अन्न विषबाधेमुळे झाले की इतर कोणत्या कारणामुळे, याबाबत मुख्य तपास अधिकारी करीत आहेत.

पाच जणांचेही नोंदवले जबाब
सामूहिक भोजनाला उपस्थित असलेल्या अन्य पाच पाहुण्यांचेही जबाब जे. जे. मार्ग पोलिसांनी नोंदवले आहेत. आपण पुलाव खाल्ला होता, परंतु उलट्या किंवा जुलाब झाले नसल्याचे त्यांनी जबाबात म्हटले आहे. दुसरीकडे चारही मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले असून चार मृतदेहांचे व्हिसेरा तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com