

भिवंडी, ता. ४ (बातमीदार) : शहरातील जीर्ण झालेल्या स्टेडियमच्या दुरुस्तीबाबत आणि शाळेजवळील खराब रस्त्याच्या पुनर्बांधणीसाठी समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार अबू आझमी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. पावसाळा सुरू होण्यापूर्वी ही दोन्ही विकासकामे पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी तातडीने उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर केलेल्या निवेदनात आझमी यांनी शहरातील समदनगर परिसरातील समादिया शाळेकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची दयनीय अवस्था मांडली आहे. हा रस्ता पूर्णपणे उखडला असून ठिकठिकाणी मोठे खड्डे आणि धुळीचे साम्राज्य निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले. समादिया शाळेत एक हजाराहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असल्याने विद्यार्थ्यांना आणि पालकांना दररोज अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी पावसाळ्यात या रस्त्यावर चिखल आणि पाणी साचून अपघातांचा धोका वाढू शकतो. त्यामुळे पाऊस सुरू होण्यापूर्वीच या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना द्यावेत, अशी विनंती त्यांनी निवेदनात केली आहे. या सुविधांच्या उभारणीमुळे परिसरातील युवकांना चांगल्या क्रीडा सुविधा उपलब्ध होतील आणि खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल, असे त्यांनी उपमुख्यमंत्र्यांना सांगितले.
टावरे स्टेडियम बिकट अवस्थेत
पश्चिम विधानसभा मतदारसंघातील परशराम टावरे स्टेडियमच्या जीर्ण अवस्थेकडेही उपमुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले. स्थानिक खेळाडू आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण असलेले हे स्टेडियम सध्या खराब अवस्थेत असून क्रीडांगणाची स्थिती दयनीय झाली आहे. जॉगिंग ट्रॅक उखडल्याने पावसाळ्यात पाणी साचते. त्यामुळे नागरिकांना सराव आणि व्यायामासाठी अडचणी निर्माण होतात. या स्टेडियमच्या दुरुस्ती व पुनर्विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणीही आझमी यांनी पालिकेच्या क्रीडा विभागाला केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.