विद्यार्थ्यांनी मैदानी खेळातून उत्तुंग भरारी घ्यावी

विद्यार्थ्यांनी मैदानी खेळातून उत्तुंग भरारी घ्यावी
Published on

मैदानी खेळातून भरारी घ्या
माजी महापौर नारायण मानकर यांचे आवाहन
वसई ता.४ (बातमीदार)ः माणिकपूर येथील जीजस अँड फाउंडेशनतर्फे १९ व्या वार्षिक फुटबॉल स्पर्धा भरवण्यात आली आहे. या स्पर्धेचे उद्‍घाटन माजी महापौर नारायण मानकर यांनी केले. या वेळी खेळातून भविष्यात भरारी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
वसई तालुक्यातील शाळकरी, महाविद्यालयीन मुलेमुली विविध खेळात नाव उज्ज्वल करत आहेत. वसई तालुका कला-क्रीडा महोत्सव त्यांना प्रोत्साहन देत आहे. याच अनुषंगाने माणिकपूर येथे फुटबॉलची स्पर्धा भरवण्यात आली आहे. तीन गटात झालेल्या या स्पर्धेत माणिकपूर, वसई परिसरातील खेळाडू मोठ्या संख्येने सहभागी झाले. या स्पर्धेला माणिकपूर गाव तसेच वसई परिसरातील प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालघर जिल्ह्यातील प्रतिष्ठित फुटबॉल स्पर्धांपैकी एक म्हणून या स्पर्धेकडे पाहिले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com