

कल्याण, ता. ४ (वार्ताहर) : कवयित्री बहिणाबाई चौधरी उद्यान व्यायाम समितीच्या वतीने लोकवर्गणीतून महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन विशेष कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. डोंबिवली (पूर्व) येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उद्यानात शुक्रवारी सकाळी हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने करण्यात आली. यामध्ये सानिका गंधे, माधुरी कोरडे तसेच ओमकार इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी आयुष तावडे आणि रॉयल इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी मयंक शिगवण यांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाला जायंट्स ग्रुप ऑफ डोंबिवलीचे अध्यक्ष मिलिंद बिराडे, ज्येष्ठ पदाधिकारी विजयसिंह परदेशी, रमेश येवले, माजी अध्यक्षा विनिता जोशी, डॉ. रमेश येवले, प्रशांत प्रधान, साक्षी शास्त्रकार; तसेच नगरसेवक मंदार टावरे, नगरसेविका अलका म्हात्रे आणि माजी नगरसेवक पप्पू म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी अवयवदानासारख्या पवित्र कार्याचे महत्त्व अधोरेखित केले. संस्थेच्या वतीने ३५ वर्षांपासून सुरू असलेल्या सामाजिक कार्याची माहिती समिती सदस्य विकास जोशी यांनी दिली. तर महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे महत्त्व कृष्णा सोमार्डे यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी नगरसेवक तथा खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयाचे प्रतिनिधी प्रकाश माने यांनी केले. आभार सानिका गंधे आणि माधुरी कोरडे यांनी मानले. अजित दामले, गणेश ठोंबरे, मेघा ठोंबरे आणि पलावा सिटी येथील वैशाली हिरे यांनी स्वेच्छेने अवयवदान नोंदणी अर्ज भरले. कार्यक्रमात १२५ ते १३० नागरिकांनी सहभाग नोंदविला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.