महावितरणचे जनित्र धोकादायक स्थितीत

महावितरणचे जनित्र धोकादायक स्थितीत
Published on

जनित्र धोकादायक स्थितीत
ग्रामस्थांची कारवाईची मागणी

कासा, ता. ४ (बातमीदार) : डहाणू तालुक्यात वीज कंपन्यांकडून अनेक ठिकाणी जुने वीज खांब, तारा आणि जनित्रांची दुरुस्ती व देखभाल कामे सुरू आहेत. मात्र, काही ठिकाणी अद्यापही वीज जनित्रे धोकादायक अवस्थेत असल्याचे चित्र दिसून येत असल्याचे चित्र असून, याबाबत दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

कासा येथील पाटील पाडा परिसरातील जनित्र (डीपी) हे जमिनीलगत बसविण्यात आले असून, या परिसरात मोठ्या प्रमाणात झाडे व गवत वाढल्याचे दिसत आहे. तसेच परिसरातील काही जण या जनित्राच्या ठिकाणी कचरा फेकत असल्याने तेथे आजूबाजूला कचऱ्याचे ढीग साचले असल्याचेदेखील पाहण्यास मिळत आहे. या ठिकाणाजवळून वाहने व पादचाऱ्यांची ये-जा असते. त्यामुळे येथे एखादा अपघात होऊ शकतो, अशी भीती स्थानिकांनी वर्तवली आहे. तसेच पावसाळ्यात या जनित्राच्या ठिकाणी पाणी साचत असल्याने तेथे शॉर्टसर्किट होऊ शकते, अशी शक्यताही दरवर्षी येथील नागरिक व्यक्त करतात. त्यामुळे या जनित्राची उंची वाढवत, तेथे सिमेंट क्राँक्रीटची भरणी करावी, अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.
-----------------
सुरक्षित उपाययोजनांची मागणी
याबाबत सामाजिक कार्यकर्ते राजकुमार गिरी सांगतात की, पाटील पाडा येथील जनित्राजवळ मोठ्या प्रमाणात गवत वाढले ते जमिनीला लागून आहे. अशा परिस्थितीत येथील स्थिती धोकादायक बनली आहे. मागील काही वर्षे येथे पावसाळ्यात पाणी भरते. सुदैवाने अद्याप काही घडलेले नाही, पण पुढे एखादा अपघात घडू शकतो, अशी स्थिती निर्माण झाली आहे. तरी वीज कंपनीनने तातडीने येथे पाहणी करून सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी आमची मागणी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com