

अलिबागमध्ये मतदार जनजागृती अभियान
नाव नोंदणी, दुरुस्ती व पडताळणीसाठी शिबिरे
अलिबाग, ता. ४ (वार्ताहर) : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अलिबाग नगर परिषदेमार्फत शहरात मतदार जनजागृती अभियान राबविण्यात आले. रविवारी (ता.३) आयोजित या उपक्रमांतर्गत पात्र नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवावे तसेच त्रुटी दूर कराव्यात, यासाठी विविध केंद्रांवर विशेष शिबिरे घेण्यात आली.
प्रभाग क्रमांक १ व २ मधील मतदारांसाठी रामनाथ शाळा येथे केंद्र निश्चित करण्यात आले होते. येथे बीएलओ यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन नोंदणी, नाव दुरुस्ती, पत्ता बदल व नाव वगळण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सुविधांचा लाभ घेतला.
निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार, १८ वर्षे पूर्ण झालेल्या नवमतदारांनी नाव नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच विद्यमान मतदारांनी आपल्या माहितीची अचूकता तपासून आवश्यक बदल करून घ्यावेत, असेही सांगण्यात आले. अनेक नागरिकांनी ऑनलाइन प्रक्रियेबाबत मार्गदर्शन घेत त्वरित अर्ज सादर केले.
शिबिरादरम्यान मतदार ओळखपत्राशी संबंधित तक्रारींचे निवारण करण्यात आले. नावातील चुका, पत्त्याची अचूकता व फोटो बदल यासंबंधी अर्ज स्वीकारून पुढील कार्यवाहीसाठी नोंद करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.