

अलिबाग जिल्हा रुग्णालयात नातेवाइकांची गैरसोय
झोपेच्या व्यवस्थेच्या अभावामुळे घेतला रिक्षाचा आसरा
अलिबाग, ता. ४ (वार्ताहर) : जिल्हा रुग्णालयात दाखल रुग्णांच्या नातेवाइकांना रात्री मुक्कामासाठी कोणतीही समाधानकारक व्यवस्था नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. झोपण्यासाठी जागा उपलब्ध न झाल्याने काही नातेवाईकांना रुग्णालय परिसरात उभ्या असलेल्या रिक्षांमध्येच रात्र काढावी लागल्याची घटना समोर आली आहे.
रुग्णांच्या सेवेसाठी दिवसभर धावपळ केल्यानंतर थकलेल्या नातेवाइकांना विश्रांतीसाठी योग्य ठिकाण मिळत नसल्याने त्यांची मोठी गैरसोय होत आहे. काही जणांनी अक्षरशः रिक्षेमध्येच आसरा घेत झोप घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले.
रुग्णालयात प्रतीक्षागृह, विश्रांती कक्ष किंवा झोपण्याची पुरेशी व्यवस्था नसल्याने ही परिस्थिती निर्माण होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. विशेषतः बाहेरगावाहून आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना अधिक अडचणींचा सामना करावा लागतो.
या प्रकारामुळे रुग्णालय प्रशासनाच्या सोयी-सुविधांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नातेवाइकांसाठी किमान मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.