डहाणूतील प्रवाशांना लाल परीचा आधार

डहाणूतील प्रवाशांना लाल परीचा आधार
Published on

डहाणू, तलासरीकरांचा सुसाट प्रवास
प्रवाशांची एसटीला पसंती, जादा फेऱ्यांची गरज
कासा, ता. ४ (बातमीदार)ः डहाणू, तलासरी तालुक्यासह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये धावणारी एसटी ग्रामीण व आदिवासी भागासाठी जीवनवाहिनी ठरत आहे. दररोज सुमारे ९ ते ११ हजार प्रवासी या सेवेचा लाभ घेत असून, वाढत्या प्रवासीसंख्येच्या पार्श्वभूमीवर जादा गाड्यांची मागणी होत आहे.
डहाणू, तलासरी, पालघर, नाशिक, जळगाव, कोल्हापूर, धुळे, संभाजीनगर, मालेगाव, जालना या मार्गांवरून एसटीची नियमित वाहतूक सुरू असते. बहुतांश फेऱ्या वेळेत असल्या तरी महामार्गावरील वाहतूक कोंडीचा परिणाम होत असल्याचे चित्र आहे. सध्या आगारात ३१ जुनी व १० नवीन बस कार्यरत आहेत. जुन्या बसमुळे ग्रामीण भागातील प्रवाशांची गैरसोय आहे.
-------------------
दुर्गम भागातील विद्यार्थी, नागरिकांसाठी एसटीचा प्रवास सोयीस्कर असतो. त्यामुळे गावखेड्यांमध्ये एसटीच्या फेऱ्या वाढवण्याची गरज आहे.
- प्रसाद पाटील, उपसरपंच, उर्से
-----------------
डहाणू आगारातून मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास करत आहेत. फलाटांची उंची वाढवली आहे. तसेच शौचालयाचे नूतनीकरण करण्यात आले आहे.
- देवेंद्र शिवदे, वाहतूक निरीक्षक, डहाणू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com