

जिल्हा रुग्णालयाचा सावळा गोंधळ
खिडकी बंद पण डिजिटल नंबर सुरूच; रुग्णांचे हाल
अलिबाग, ता. ४ (वार्ताहर) ः रायगड जिल्हा रुग्णालयात केस पेपर काढण्यासाठी रुग्णांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. रुग्णालयातील तीनपैकी एक खिडकी बंद असल्याने रुग्णांच्या रांगा लांबल्या आहेत. तांत्रिक गोंधळामुळे रुग्ण आणि नातेवाइकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
जिल्हा रुग्णालयात पारदर्शकता आणण्यासाठी डिजिटल टोकन पद्धत सुरू करण्यात आली आहे. मात्र, सध्या एक खिडकी बंद असतानाही त्यावरील डिजिटल डिस्प्लेवर क्रमांक झळकत आहेत. आपला नंबर लागल्याचे समजून रुग्ण त्या खिडकीकडे धाव घेतात. मात्र, तिथे कर्मचारी नसल्याचे पाहून त्यांना पुन्हा रांगेत उभे राहावे लागत आहे. यामुळे रुग्णांमध्ये मोठा गोंधळ निर्माण होत आहे. सध्या केवळ दोनच खिडक्यांवर काम सुरू असल्याने सकाळपासूनच रुग्णांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. विशेषतः वृद्ध, महिला आणि लहान मुलांसह आलेल्या नागरिकांना याचा अधिक त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे. तर, लांबून आलेल्या रुग्णांना तासनतास थांबावे लागत असल्याने मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, रुग्णालय प्रशासनाने तातडीने बंद खिडकी सुरू करावी आणि डिजिटल प्रणाली सुरळीतपणे कार्यान्वित करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, रुग्णालय प्रशासनाने तातडीने बंद खिडकी सुरू करावी आणि डिजिटल प्रणाली सुरळीतपणे कार्यान्वित करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा येत्या काळात ही समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे
फोटो ओळ
अलिबाग ः जिल्हा रुग्णालयात केस पेपर काढण्यासाठी रुग्णांची मोठी रांग लागली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.