तीन महिन्यांच्या बाळासह पिता बेपत्ता

तीन महिन्यांच्या बाळासह पिता बेपत्ता
Published on

ठाणे, ता. ४ : अबुधाबीहून भारतात परतल्यानंतर पत्नीच्या डोळ्यादेखत तीन महिन्यांच्या बाळाला घेऊन पसार झालेल्या पित्याचा अद्याप शोध लागलेला नाही. या घटनेला तब्बल दहा दिवस उलटूनही बाळाचा ठावठिकाणा न लागल्याने आईची चिंता वाढली आहे. पतीच्या शोधासाठी पोलिसांचे विशेष पथक हैदराबादला रवाना झाले आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक मंजुषा भोंगळे यांनी दिली.
मुंब्रा येथील २९ वर्षीय महिला आपल्या ३८ वर्षीय पती आणि तीन महिन्यांच्या बाळासह अबुधाबी येथे राहत होत्या. २२ एप्रिलला हे कुटुंब मुंबईत परतले. २३ एप्रिलच्या पहाटे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचल्यानंतर महिला माहेरी जाण्यासाठी कारने मुंब्र्याकडे निघाल्या होत्या. पहाटे ३.२५ वाजण्याच्या सुमारास माजिवाडा येथील एका उपाहारगृहाजवळ पतीने ‘मित्राला बाळ दाखवायचे आहे’ असे सांगत बाळ ताब्यात घेतले. पत्नीने विरोध करूनही त्याने जबरदस्तीने बाळ घेतले आणि महत्त्वाच्या कागदपत्रांची बॅग घेऊन दुसऱ्या कारमधून पसार झाला. घटनेनंतर महिलेने पतीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो केवळ संदेश व्हॉट्‍सॲप कॉलद्वारे बोलत असल्याचे समोर आले. त्यामुळे त्याचे नेमके ठिकाण शोधण्यात पोलिसांना अडचणी येत आहेत. संबंधित व्यक्ती हा हैदराबाद येथील रहिवासी असल्याने त्याच्या शोधासाठी विशेष पथक रवाना करण्यात आले आहे. दहा दिवस उलटूनही बाळाचा शोध न लागल्याने पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अधिक वेगाने सुरू केला असून, कापूरबावडी पोलिस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com