पेण शहरात ३८ वर्षीय महिलेकडून दिड कीलो गांजा हस्तगत

पेण शहरात ३८ वर्षीय महिलेकडून दिड कीलो गांजा हस्तगत
Published on

पेण शहरात महिलेकडून दीड कीलो गांजा जप्त
पेण, ता.४ (वार्ताहर) : रायगड जिल्ह्याला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी पोलिस प्रशासनाने कंबर कसली असून, पेण शहरात पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत ३८ वर्षीय महिलेकडून दीड किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. २८ एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
रायगडच्या पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांनी जिल्ह्यातील अवैध धंदे आणि अमली पदार्थांच्या विक्रीवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर, पेण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप बागुल यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, शहरातील नगरपालिका मैदानाजवळील खाऊगल्ली परिसरात एक महिला गांजा विक्रीसाठी येणार आहे. यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा लावत महिलेला ताब्यात घेतले. या महिलेची झडती घेतली असता, तिच्याकडे १.२९८ किलो गांजा आढळून आला. या मालाची बाजारपेठेत किंमत सुमारे ३० हजार रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. या महिलेला अटक केली असून तिच्यावर पेण पोलिस स्थानकात गुन्हा नोंदविला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com