

श्रमजीवी संघटनेचा आंदोलनाचा पवित्रा
विरार, ता. ४ (बातमीदार)ः पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील इयत्ता ९वी ते १०वीचे वर्ग बंद करण्याच्या निर्णयाविरोधात श्रमजीवी संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. या निर्णयामुळे हजारो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती असल्याने तीव्र आंदोलनाचा निर्धार श्रमजीवी संघटनेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या निर्णयाचा फटका जिल्ह्यातील ५७ शाळांना बसणार आहे. सध्या या शाळांमध्ये सात हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. वर्ग बंद झाल्यास हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पायपीट करावी लागणार आहे, तर अनेकांचे शिक्षण कायमचे सुटेल, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे एकीकडे केंद्र, राज्य सरकार विकसित भारत करण्याचे स्वप्न पाहत आहे, तर दुसरीकडे ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणावरच गदा आली आहे. त्यामुळे उसगाव येथील श्रमजीवी संघटनेच्या सर्वसाधारण सभेत पालघर जिल्हा अध्यक्ष सुरेश रेंजड यांनी आंदोलनाचा ठराव मांडला आहे.
----------------------------
आंदोलनाची रूपरेषा
जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, गावपातळीवर पालकांना संघटित करून जनजागृती करणे, पालक, विद्यार्थ्यांसह शिक्षण विभागाच्या दारात आंदोलन तसेच गरज पडल्यास हा लढा मंत्रालयापर्यंत नेण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
============
प्रशासनाने हा निर्णय तातडीने मागे घेतला नाही, तर विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी श्रमजीवी आंदोलन छेडेल.
- चंद्रा जाधव, प्रवक्ता, श्रमजीवी संघटना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.