माजी कर्मचाऱ्यानेच लावला कंपनीला ४३ लाखांचा चुना

माजी कर्मचाऱ्यानेच लावला कंपनीला ४३ लाखांचा चुना
Published on

माजी कर्मचाऱ्यानेच लावला कंपनीला ४३ लाखांचा चुना
नवी मुंबई, ता. ४ (वार्ताहर) : तुर्भे येथील जनरल डायग्नोस्टिक इंटरनॅशनल प्रा. लि. या कंपनीत सीनियर एक्झिक्युटिव्ह या पदावरील वरिष्ठ अधिकाऱ्याने कंपनीला तब्बल ४३ लाख ५६ हजार रुपयांचा चुना लावून पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. एपीएमसी पोलिसांनी या प्रकरणी सदर वरिष्ठ अधिकारी व त्याचे वडील या दोघांविरोधात अपहाराचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.
या प्रकरणातील आरोपी नझर मोहम्मद अम्मर बहाऊद्दीन (३१) हा कल्याण येथे राहण्यास असून, तो १२ नोव्हेंबर २०२४ पासून तुर्भे येथील जनरल डायग्नोस्टिक इंटरनॅशनल प्रा.लि. या कंपनीत सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून कार्यरत होता. त्यामुळे त्याच्यावर कंपनीच्या बँक खात्यांचे व्यवहार सांभाळण्याची जबाबदारी विश्वासाने सोपवण्यात आली होती. याचाच गैरफायदा उचलत आरोपीने १५ जून २०२५ ते १४ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत कंपनीतील ३८ लाख ७२ हजार ७४५ रुपये स्वतःच्या कोटक महिंद्रा बँकेत तसेच ८५ हजार ०४४ रुपये स्वतःच्या आयसीआयसीआय बँक खात्यावर वळवले केले. त्याचप्रमाणे वडील अम्मर गुलाम गुआस बहाऊद्दीन यांच्या खात्यावर दोन लाख ७५ हजार ५७२ रुपये तसेच इतर बँक खात्यावर एक लाख २३ हजार रुपये वळवले.
दरम्यान, आपली चोरी पकडली जाऊ नये, यासाठी आरोपी नझर मोहम्मद अम्मर बहाऊद्दीन याने १४ फेब्रुवारी रोजी कोणतीही कल्पना न देता अचानक या कंपनीतील नोकरी सोडली. यादरम्यान एका पुरवठादाराकडून पेमेंट न मिळाल्याची तक्रार आल्यानंतर कंपनीने अंतर्गत ऑडिट केले. त्यानंतर आरोपी नझर मोहम्मद अम्मर बहाऊद्दीन याने कंपनीच्या खात्यातील तब्बल ४३ लाख ५६ हजार रुपये परस्पर स्वतःच्या आणि वडिलांच्या खात्यावर वळवल्याचे आणि हिशोबात फेरफार केल्याचे उघड झाले. त्यानंतर कंपनीचे असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट मंजित करतार सिंग यांनी एपीएमसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी कंपनीचा माजी वरिष्ठ कार्यकारी नझर मोहम्मद अम्मर बहाऊद्दीन याच्यासह त्याच्या वडिलांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. तसेच पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com