जनगणना कामात हलगर्जीपणा भाेवला

जनगणना कामात हलगर्जीपणा भाेवला
Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ४ : जनगणना प्रक्रियेत हलगर्जी केल्याप्रकरणी दिवा प्रभाग समितीअंतर्गत येणाऱ्या तीन शाळांतील शिक्षकांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. प्रशिक्षणासाठी वारंवार सूचना देऊनही टाळाटाळ केल्याचा ठपका ठेवत संबंधित शिक्षकांविरोधात अखेर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जनगणना मोहिमेसाठी ठाणे महापालिकेकडून नियुक्त कर्मचाऱ्यांना वेळोवेळी प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून माहिती संकलनाची अचूक पद्धत, डिजिटल प्रणालीचा वापर तसेच नागरिकांशी संवाद याबाबत मार्गदर्शन केले जाते. मात्र, दिवा प्रभागातील ड्यू ड्रॉप स्कूल, ग्लोबल इंग्लिश स्कूल आणि साउथ इंडियन स्कूल येथील काही शिक्षकांनी या प्रशिक्षणाला उपस्थित राहण्यास टाळाटाळ केल्याचे समोर आले. प्रशासनाने यापूर्वी नोटिसा बजावूनही संबंधित शिक्षकांनी गांभीर्य दाखवले नाही. परिणामी, जनगणनेच्या कामात अडथळा निर्माण होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर महापालिकेने कठोर भूमिका घेतली. अखेर संबंधितांविरोधात स्थानिक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

प्रशासनाचा इशारा
या कारवाईमुळे शिक्षकवर्गामध्ये खळबळ उडाली आहे. जनगणना कामात हलगर्जी करणाऱ्यांविरोधात पुढील काळात आणखी कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com