एक रुपयांच्या भूभाड्यासाठी ठाण्याच्या फेऱ्यांना ब्रेक

एक रुपयांच्या भूभाड्यासाठी ठाण्याच्या फेऱ्यांना ब्रेक
Published on

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ४ : एमआयडीसी निवासी परिसरातील भूखंडधारकांना दरवर्षी केवळ एक रुपया भूभाडे भरण्यासाठी ठाण्यातील कार्यालयात जावे लागत असल्याने होत असलेल्या त्रासाच्या पार्श्वभूमीवर अखेर प्रशासनाने तात्पुरता दिलासा दिला आहे. १५ मेपर्यंत हे भूभाडे डोंबिवली एमआयडीसी कार्यालयातच स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला असून, स्थानिक पातळीवर भरण्याची सुविधा प्रथमच उपलब्ध झाली आहे.

एमआयडीसीकडून तीन ते चार दशकांपूर्वी निवासी भूखंड ९५ वर्षांच्या भाडेपट्ट्यावर देण्यात आले आहेत. या भूखंडांचे वार्षिक भाडे केवळ एक रुपया असले तरी ते भरण्यासाठी भूखंडधारकांना ठाण्यातील वागळे इस्टेट येथील प्रादेशिक कार्यालयात प्रत्यक्ष जावे लागते. आगाऊ भरण्याची सुविधा नसल्याने दरवर्षी स्वतंत्रपणे प्रवास करावा लागत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी होती. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना हा प्रवास अधिक जाचक ठरत होता. या पार्श्वभूमीवर मिलापनगर रेसिडेंट्स वेल्फेअर असोसिएशनने ऑनलाइन भरणा सुविधा सुरू करावी किंवा डोंबिवलीतच सोय उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी लावून धरली होती. संघटनेचे अध्यक्ष अविनाश दुसाने आणि सदस्यांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन निवेदन सादर केल्यानंतर हा विषय गतीमान झाला. केळकर यांच्या पुढाकाराने एमआयडीसी अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत तात्पुरत्या स्वरूपात स्थानिक सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com