वागळे इस्टेटमध्ये महावितरणच्या डीपीला आग

वागळे इस्टेटमध्ये महावितरणच्या डीपीला आग
Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ४ : वागळे इस्टेट परिसरातील ज्ञानेश्वर नगर येथे सोमवारी (ता. ४) पहाटे महावितरणच्या डीपीला अचानक आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र या आगीचा फटका त्या परिसरातील चार चाळींना बसला असून त्या चाळींचा खंडित झालेला वीजपुरवठा सुमारे नऊ-दहा तासांनंतर सुरू झाल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

वागळे इस्टेट, ज्ञानेश्वर नगर परिसरातील पोलिस चौकीजवळील महावितरणच्या डीपीला सोमवारी पहाटे सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची माहिती प्राप्त झाली. ही माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान, महावितरण कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने तत्काळ कार्यवाही करत त्या आगीवर पहाटे ३.२० वाजण्याच्या सुमारास पूर्णपणे नियंत्रण मिळविले. डीपीला आग लागल्याने पहाटेपासून काही चाळींचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता. ते काम दुपारी पूर्ण झाल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com