अन्न विषबाधा -केमिकल -बॅक्टेरियल कारण अजून स्पष्ट नाही

अन्न विषबाधा -केमिकल -बॅक्टेरियल कारण अजून स्पष्ट नाही
Published on

पायधुनी मृत्यू प्रकरणाचे गूढ कायम

‘न्यायवैद्यक’चा तपास सुरू; ठाेस निष्कर्षाची प्रतीक्षा

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : पायधुनी येथे बिर्याणी खाल्ल्यानंतर काही वेळानंतर कलिंगड खाणाऱ्या एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला हाेता. आठवडा उलटूनही या मृत्यूमागील कारण स्पष्‍ट न झाल्यामुळे गूढ वाढले आहे. अन्नभेसळ, विषबाधा, तसेच जिवाणू किंवा बुरशीजन्य संसर्गाच्या शक्यता शक्यता तपासल्या जात आहेत; मात्र ठाेस निष्कर्ष काढलेला नाही. रासायनिक कारणे किंवा विषबाधेची शक्यता नाकारता येत नाही, अशी माहिती कलिना येथील न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा (एफएसएल) संचालनालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

‘सध्या नमुन्यांवर रासायनिक विश्लेषण (केमिकल अ‍ॅनालिसिस) सुरू असून, ऑरगॅनिक व इनऑरगॅनिक विष याबाबत परीक्षण करण्यात येत आहे. अहवाल पूर्ण होईपर्यंत कोणताही निष्कर्ष काढणे योग्य नाही. यात थोडे जरी विषारी घटक आढळले, तर ते स्पष्टपणे अहवालात नमूद केले जातील,’ असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

शेतीतील दूषित वातावरण, उंदीर किंवा इतर घटकांमुळे होणारा संसर्ग, अन्नाची अयोग्य साठवण यांसारख्या बाबींचाही तपास सुरू आहे. तपास अधिकाऱ्यांनी अन्नातील भेसळ, बुरशी, नैसर्गिक संसर्ग किंवा इतर कारणांची शक्यता नाकारलेली नाही. त्यामुळे सर्व अंगांनी तपास केल्यानंतरच अंतिम निष्कर्ष जाहीर केला जाणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
---
लवकरच अहवाल देणार
सर्व चाचण्या पूर्ण झाल्यानंतर लवकरच अधिकृत अहवाल पोलिसांकडे सादर केला जाणार आहे. त्यानंतरच या प्रकरणाचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. न्यायवैद्यक प्रयाेगशाळेने नागरिक आणि माध्यमांना अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत अहवालाची प्रतीक्षा करण्याचे आवाहन केले आहे. अहवाल पूर्ण होण्यापूर्वी निष्कर्ष काढल्यास जनतेत संभ्रम निर्माण हाेऊन वैज्ञानिक तपास प्रक्रियेला विलंब हाेऊ शकताे, असेही त्यांनी सांगितले.
---
‘मॉर्फिन’बाबत अद्याप निष्कर्ष नाही!
- ‘मॉर्फिन’ किंवा इतर रासायनिक घटकांबाबत एफएसएल प्रयोगशाळेतून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. सर्व अहवाल केवळ पोलिसांना दिले जातात, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
- तपासात जीसी (गॅस क्रोमॅटोग्राफी)सारख्या प्रगत तंत्रांचा वापर केला जात असून, मॉर्फिनसह विविध रासायनिक घटक ओळखण्याची क्षमता प्रयोगशाळेकडे आहे. त्यामुळे नमुन्यात विषारी किंवा औषधी घटक असल्यास, ते निश्चितपणे तपासणीत आढळतील, असेही त्यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com