

बेलापूरमध्ये दशक्रिया सुविधा प्रकल्पाचे लोकार्पण
स्थानिकांना आधुनिक, सुसज्ज सुविधा उपलब्ध
तुर्भे, ता. ४ (बातमीदार) : बेलापूर सेक्टर १५ येथील ब्रिजखाली दशक्रिया विधीसाठी आवश्यक सुविधा नसल्याने नागरिकांना अनेक वर्षांपासून अडचणींचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर मंदा म्हात्रे यांच्या पुढाकारातून महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाकडून सुमारे चार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून विविध विकासकामे पूर्ण करण्यात आली. या कामांचा लोकार्पण सोहळा स्थानिकांच्या उपस्थितीत पार पडला.
पूर्वी या ठिकाणी पिण्याचे पाणी, बसण्याची व्यवस्था व स्वच्छता सुविधा नसल्याने नागरिकांना धार्मिक विधी करताना त्रास सहन करावा लागत होता. नव्या प्रकल्पांतर्गत दशक्रियेसाठी स्वतंत्र जागा, गणेश विसर्जन घाट, जेट्टी, पाणीपुरवठा व परिसर सुशोभीकरण करण्यात आले आहे.
या लोकार्पण सोहळ्यास माजी नगरसेवक दि. ना. पाटील, भाजपा ज्येष्ठ कार्यकर्ता गोपाळराव गायकवाड, भाजपा नेते तथा महामंत्री नीलेश म्हात्रे, बेलापूर मंडळ अध्यक्ष अजय सिंग, मोहन मुकादम, प्रकाश मुकादम, समाजसेविका ज्योती पाटील, समाजसेवक संतोष कोळी, खांदेवाले मच्छीमार संस्था अध्यक्ष रमेश हिंडे, मनीष बिजलानी, दिवाळे ज्येष्ठ नागरिक संस्था अध्यक्ष चंद्रकांत कोळी तसेच विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट
नागरिकांना दिलासा
या विकासामुळे नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित व सुसज्ज वातावरणात धार्मिक विधी करता येणार असून, अनेक वर्षांची प्रलंबित मागणी पूर्ण झाल्याने समाधान व्यक्त होत आहे. भविष्यातही अशा सुविधा वाढवाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.