

मिरा-भाईंदरचा विकास निधी ठाण्याला
प्रताप सरनाईक-नरेंद्र मेहतांमधील वादाचा परिणाम
भाईंदर, ता. ४ (बातमीदार): मिरा-भाईंदर शहरातील विविध विकासकामांसाठीचा १३८ कोटींचा विशेष निधी ठाण्यातील प्रकल्पांसाठी वळवण्यात यावा, असे पत्र सरनाईक यांनी दिले. मिरा-भाईंदरचे आमदार नरेंद्र मेहता यांच्यासोबत सुरू असलेला वादामुळे हा निर्णय घेतला असल्याची चर्चा रंगली आहे.
मिरा-भाईंदर शहारातील विविध प्रकल्पांसाठी प्रताप सरनाईक यांनी राज्य सरकारकडून कोट्यवधींचा विशेष निधी मंजूर करून आणला आहे. या निधीतून उत्तन घनकचरा प्रकल्पाच्या ठिकाणी काँक्रीटचा रस्ता, भाईंदर पश्चिम येथे मासळी बाजार, पालिका मुख्यालय नूतनीकरण, मलनिस्सारण केंद्र, गोपीनाथ मुंडे क्रीडा संकुल नूतनीकरण, रुग्णालयात हवा शुद्धीकरण यंत्रणा, पेणकर पाडा येथे घनकचरा प्रकल्प, प्रमोद महाजन कलादालनाचे कामांचा समावेश होता. मात्र, हा निधी ठाणे परिसरातील वाघबिळ येथील आप्पासाहेब धर्माधिकारी नाट्यगृहासाठी वळवण्यात यावा, असे पत्र सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले. त्यामुळे मिरा-भाईंदरमधील प्रकल्प रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
---------------------------
मिरा-भाईंदरमधील महत्त्वाच्या विकासकामांसाठी निधी मंजूर करवून आणला होता. मात्र, या प्रकल्पांना आमदार नरेंद्र मेहता यांनी विरोध केला. त्यांना ही विकासकामे नको असतील म्हणून हा निधी माझ्या मतदारसंघातील ठाण्यात वळवला आहे.
-प्रताप सरनाईक, आमदार
---------------------------------
एका आमदाराचा निधी दुसऱ्या आमदाराच्या मतदारसंघात वापरता येत नाही. या कारणावरून खुद्द मुख्यमंत्र्यांनी हा निधा रद्द केला आहे. उप-मुख्यमंत्र्यांनी त्याला मान्यता दिली आहे.
- नरेंद्र मेहता, आमदार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.