ठाणे–खारघर मार्गावर तृतीयपंथीयांचा वाढता वावर

ठाणे–खारघर मार्गावर तृतीयपंथीयांचा वाढता वावर
Published on

ठाणे-खारघर मार्गावर तृतीयपंथींचा वाढता वावर
प्रवाशांची पोलिसांकडे कारवाईची मागणी
वाशी, ता. ४ (बातमीदार) : ठाणे-बेलापूर ते खारघर या मार्गावर रात्रीच्या वेळी वाढलेल्या गैरप्रकारांमुळे प्रवाशांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. मागील काही महिन्यांत या मार्गावर तृतीयपंथींचा मोठ्या प्रमाणात वावर वाढल्याचे दिसून येत असून, काही ठिकाणी अश्लील हावभाव व संशयास्पद हालचाली होत असल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून करण्यात येत आहेत. दिघा-ऐरोली नाका, घणसोली, महापे उड्डाणपूल, जुईनगर, सानपाडा तसेच खारघर टोलनाका परिसरात संध्याकाळपासून रात्री उशिरापर्यंत गर्दी दिसते.
या मार्गावर २४ तास वाहतूक सुरू असल्याने उशिरा प्रवास करणारे नागरिक, रिक्षाचालक आणि खासगी वाहनचालक यांना असुरक्षित वाटत असल्याचे सांगितले जाते. काही ठिकाणी मद्यपी व संशयित व्यक्तींचाही वावर वाढल्याची तक्रार आहे. स्थानिकांनी वारंवार पोलिसांना माहिती दिली असली तरी वेळेवर प्रतिसाद मिळत नसल्याचेही आरोप केले जात आहेत.
चौकट
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर
प्रवाशांच्या मते, या मार्गावरील वाढते गैर प्रकार केवळ त्रासदायक नसून. भविष्यात गंभीर गुन्ह्यांना खतपाणी घालू शकतात. त्यामुळे नियमित पोलिस पेट्रोलिंग, अंधाऱ्या भागात प्रकाशयोजना आणि संशयित हालचालींवर तत्काळ कारवाई करणे अत्यावश्यक असल्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com